मंगळवार, २२ जुलै, २००८

राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण प्रेषक वैशाली हसमनीस ( शुक्र, 06/20/2008 - 13:46) .

राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाणआपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत।त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच! नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी.संपूर्ण प्रांत हिच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झाला आहे.घाठावर अनेक सुंदर देवळे,एक पांडुरंगाचेही देउळ आहे.तिथेच कोटी शिवलिंगावर रोज संध्याकाळी कारंज्यातून अभिशेक केला जातो.ते द्रुश्य बघण्यासारखे असते.गोदावरीवर वरुन रोड व खालून रेल्वे पूल बांधला आहे. हा आशियातील दुसरा सर्वात लांबीचा पूल आहे्. हे गाव निसर्गाने देखणे केले आहे.जिकडे-तिकडे हिरवेगार! नारळाची झाडेच झाडे!सगळीकडे भाताची रोपे सळसळणारी.येथील केळीहि फारच रुचकर.गावातील रस्ते पक्क्या बांधणीचे.रस्त्यांची दुर्दशा नाही.गावात अनेक जागी देवळे.लोक देवभक्त व पापभीरू ,आतिथ्यशील. आनंद रिजन्सी आणि रिव्हर बे ही दोन होटेल्स पंचतारांकित.येथून नदीत सफर करता येते.सुती कापडाची मोठी बाजारपेठ .अनेक मारवाडींची वस्ती.थोडक्यात हे तेलगू कोंकण आहें. निसर्गाने ह्या गावावर आपला वरदहस्त ठेवला आहें .
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.