सोमवार, २१ जुलै, २००८

धमुचे केळवण (जेव्हा पुरी नि भाजी - ) प्रेषक अमोल केळकर ( गुरू, 06/26/2008 - 13:43) .

मनस्वी ताईंनी 'धमाल मुलासाठी 'केलेला केळवणाचा बेत पाहुन तोंडाला पाणी सुटले आणी हे काव्य ही
स्फुरलेचालः जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली ,झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली !!
गीत - मंगेश पाडगावकरसंगीत - यशवंत देवस्वर - अरुण दाते
------------------------------------------------------------------------
जेव्हा पुरी नि भाजी ताटात ही पडाली !
जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली। !!

ताटातल्या अन्नांचे मणिहार मांडलेले !
भोवती काकडीचे सॅलेड सजलेले !
खुशीत पाहुण्यांची पंगतही बसली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली। !!

आमटीतल्या शेंगाना कोवळा स्पर्श होता!
वाटीतल्या रसाला केसर रंग होता !
आ़जीच्या ताटातली बेसन वडी मिळाली ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली। !!

नसतेच भुक जेव्हा, असते शांत
सारेवासाचा गंध येता पोटात काव
कावेओथंबला तुपानी मेतकुटभात भारी ! जेवुनी हेच सारे ढेकर मस्त आली. !!
अवांतर - कैवल्या माझ्यातर्फे हे कवितारुपी केळवण गोड मानुन घे
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.