सोमवार, २१ जुलै, २००८

(ही पाल तुरुतुरु__) प्रेषक अमोल केळकर ( शनी, 07/12/2008 - 11:09) .

(ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळु )
मराठीतील एक प्रसिध्द गाणेही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु डाव्या डोळ्यावर बट सरली या चालीवर खालील रचना---------------------------------ही पाल तुरुतुरु, चढी भिंतीवरती हळुवरच्या खिडकीतुन आत सरली !की उंचावरच्या कप्प्यात, अडगळीच्या जागेत पालीण सळसळली !!
कोळ्यांशी मैत्री जमव ना !जाळिशी फिल्डिंग लाव ना !शेपुट वळ वळ कर ना!डासांवरती झडप घाल ना !मनी खालुन जाता वरं वळुन पाहाता,पाल संकटात सापडली !!
उगाच झाडू हाणून !फवारा हिटचा मारुन !शेपुट चाचपुन काठीन !तोंड जरा दाबुन चपलेन !हा त्रास जिवघेणा , सारा माणसांचा बहाणा,आता माझी इथली ह्द्द संपली !!-------------------------------------मुळ गाणे -
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरुडाव्या डोळ्यावर बट ढळलीकी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनातनागीण सळसळली !
इथं कुणी आसपास ना !डोळ्याच्या कोनात हास ना ?तू जरा माझ्याशी बोल ना ?ओठांची मोहोर खोल ना ?तू लगबग जाता मागं वळून पाहातावाट पावलांत अडखळली
उगाच भुवई ताणूनफुकाचा रुसवा आणूनपदर चाचपून हातानंओठ जरा दाबीशी दातानंहा राग जीवघेणा खोटा खोटाच तो बहाणाआता माझी मला खूण कळली
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.