सोमवार, २१ जुलै, २००८

बेवडे प्रेषक केशवसुमार ( बुध, 07/16/2008 - 22:37) .

स्वातीताईंची पावले ही सुंदर कविता वाचली आणि आम्हाला आमची वाकडी तिकडी पडणारी पावले आठवलीबेवडे.
पिता पिता बेवडेथांबतात,थकतात,कि कानोसा घेतात..
आपल्याच सभोवतालचा!
पिता पिता बेवडेअडखळतात,मागे बघतात,कि चाचपतात. .
आपल्याच खिश्याला!
पिता पिता बेवडेशिणतात,वैतागतात,कि विचार करतात..
"ते पिता आहेत,कि पाजवली जात आहे याचा!"
पिता पिता बेवडेचाचपतात,विचार करतात,कि पडताळून पहातात..
"दु:ख आहे म्हणून..ते पितात,कि ते पितात म्हणून..दु:ख आहे?"
पिता पिता बेवडेथांबतात,अडखळतात,कि विचारी बनतात!!!
====================आपला केशवसुमार................२००८
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.