सोमवार, २१ जुलै, २००८

सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा) प्रेषक अमोल केळकर ( शनी, 07/19/2008 - 10:23) .

सिनेमातल्या हिरोंची पूर्वी भरली सभा,दाऊद होता सभापती मधोमध उभा.दाऊद म्हणाला, दाउद म्हणाला, "मित्रांनो,खंडणीत सूट, खंडणीत सूट !तुमचे -आमचे सर्वांचे जुळेल सूत !
या हिरोगीरिचे कराल काय?
संजय म्हणाला " ढिशांव ढिशांव करुन मी मारीन लोंका "
सल्लू म्हणाला,"ध्यानात ठेवीन, ध्यानात ठेवीनमी ही माझ्या गाडीने असेच करीन असेच करीन"
शाहरुख म्हणाला," खुषीत येईन तेव्हा, क_क करीत राहीन."
प्रिती म्हणाली, "नाही ग बाई, राणीसारखे माझे मुळीच नाही,खूप खूप रागवीन तेंव्हा क्रिकेट खेळीन, क्रिकेट खेळीन".
तुषार म्हणाला, "होईल गोची तेव्हा माझ्या बहिणीची मलाच बंडी."
अक्षय म्हणाला, "कधी वर, कधी खाली, जहिरातींवर मारीन उडी."
जॉनी म्हणाला, "विनोद म्हणजे कठिण काम, कठिण कामकरत राहीन सिनेमात, करत राहीन सिनेमात."
सैफ म्हणाला, "माझे काय?""तुझे काय? हा हा हा !करिना पण समजुन जाय."
रेखा म्हणाली, "रोल रोल समजुन करीन, सिनेमात मी,अभिषेकची आई होईन."
दाऊद म्हणाला, "छान छान छान!'भाईच्या' देणगीचा ठेवा मान.आपुल्या भुमिकेचा उपयोग करा."
"नाही तर काय होईल?"
"न ऐकणार्‍यांगत, तुमचा गेम होऊन जाईल."
-------------------------------------------------------------------------मुळ गाणे -
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,पोपट होता सभापती मधोमध उभा.पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो,देवाघरची लूट, देवाघरची लूट !तुम्हा-आम्हा सर्वांना एक एक शेपूटया शेपटाचे कराल काय ?"
गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी मारीन माश्या."
घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीनमीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"
कुत्रा म्हणाला, "खुषीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."
मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,खूप खूप रागवीन तेंव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."
खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."
माकड म्हणाले, "कधी वर, कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."
मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हातपोहत राहीन प्रवाहात, पोहत राहीन प्रवाहात."
कांगारू म्हणाले, "माझे काय?""तुझे काय? हा हा हा !शेपूट म्हणजे पाचवा पाय."
मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीनपावसाळ्यात नाच मी करीन."
पोपट म्हणाला, "छान छान छान!
देवाच्या देणगीचा ठेवा मान.आपुल्या शेपटाचा उपयोग करा."
"नाही तर काय होईल?"
"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."
गीत - ग। दि. माडगूळकरसंगीत - दत्ता डावजेकरस्वर - आशा भोसलेचित्रपट - पाहू किती रे वाट (१९६३ )
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.