सोमवार, २१ जुलै, २००८

बिग बी प्रेषक केशवसुमार ( शनी, 07/19/2008 - 13:16) .

(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. सर्किटकाकांचे "बप्पा"वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील वाचकांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "विडंबन" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे. तेव्हा येथील सिद्धहस्त कवींनी सुधारणा सुचवाव्या, ही विनंती.)
लहानपणी सिनेमात, सतत पाहिला तुलागाजर का हलवा खात बसायचास नाष्ट्यालापायात नौ नंबरच्या चप्ला रुबाबासाठीआईशप्पत, तुझ्या चंगळीचा हेवा वाटला
झालो मोठा थोडा, तेव्हा बघितलं एकदाचराखी-रेखामधली निवड, तीदेखील पहिल्यांदाचहे डिसिजन तुला, नाही करावे लागले मित्राकुछ भी कहो, लेकीन थोडा जळजळ हुवाच
नंतर एकदा दिसलास, आय काँग्रेसच्या निवडणुकीलाराजीव नवा आहे, सांभाळून घ्या, विनंती करायलाथ्यांकू व्हेरी मच, असचं काहिस म्हणालासतुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला.
आता तर काय, तू नेहमीच फसवतोसघराघरात्या टिव्हीतून, तू सारखाच दिसतोसपुढे येतात ते सगळे, वेगवेगळे प्रॉडक्टस,त्यांच्यातले तुझ्या निवास्थानी काही वापरतोस?
रुपाच्या अंडरवेअरसाठी, घालू का तुला गाऱ्हाणे?सध्या तुझे वर्कलोड, वाढले आहे म्हणेतुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासीत्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
- केशवसुमार (१९ जुलॅ २००८)
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.