मंगळवार, २२ जुलै, २००८

वांगी पोहे गीता कुलकर्नि गुरु, २३/०२/२००६ - ०२:०४.

वाढणी:चार माणसे
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाटी पोहे, १ चमचा तिखट, २ छोटी वांगी, मीठ, साखर, थोडीशी चिंच, थोडा
गोडा मसाला.
खोबरे, कोथिंबीर, शेव
क्रमवार मार्गदर्शन:पोहे धुवून घेणे. वांगी पातळ चिरुन घेणे. कढईत फोडणीत हिंग,मोहरी, कढीपत्ता, हळद घालून मग वांगी घालणे. वाफ आल्यावर पोहे व सर्व जिन्नस घालणे. चिंचेचे पाणी कोळून घालणे. पाच मिनीटे मंद आंचेवर वाफ द्यावी. गरम पोह्यावर खोबरे,कोथिंबीर घालुन खाणे. आवडत असल्यास बारीक शेव वरुन पेरणे.
माहितीचा स्रोत:घरातील पध्दत। खूप खमंग लागतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.