मंगळवार, १५ जुलै, २००८

जयपुरी पनीर अपर्णा १ शनि, १८/०८/२००७ - १०:४२.

वाढणी:साधारण ४ माणसे
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
क्रमवार मार्गदर्शन:
जिन्नस
पनीर २०० ग्राम
अ)पाव काप ..........काजू काप पाव काप............ सुके खोबरे १ चमचा .............खसखस पाव काप ..............दूध पाव काप ............दहीब) कांदा २ टोमॅटो २ अद्रक लसूण पेस्ट .........२ चमचे ,हिरवी मिरची २-३ दालचिनी .................२ तुकडे तिखट ............................... १/२ चमचा जिरं पूड ......................१ चमचा गरम मसाला ............१ चमचा ,मीठ चवीनुसार
क्रमवार मार्गदर्शन
१) प्रथम वरील(अ) मधील साहित्य एकत्र १ तास भिजत ठेवावे आणि नंतर मिक्सर मधून काढून घ्यावे.
२) वरील (ब) मधील साहित्य मिक्सर मधून काढावे .
३) कढई मध्ये तेल २ चमचे गरम करावे त्यात (ब) पेस्ट टाकावी, तेल सुटू द्यावे, त्यात (अ) पेस्ट टाकावी ,आणि पनीर तुकडे टाकावी. १-२ चुटकी साखर टाकावी. पानी टाकावे. उकळी आल्यावर मलई टाकावी. मंद आचेवर उकळू द्यावे.५ मिनिटे.
माहितीचा स्रोत:माझी आई
अधिक टीपा:ही भाजी गरम नान सोबत छान लगते ।
हे मनोगत वरुण घेतले आहे.