बुधवार, १६ जुलै, २००८

टोफ़ू मेथी चौकस शुक्र, २०/०४/२००७ - २१:१९.

वाढणी:दोन जणाना पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
टोफ़ू एक पाकीट
मेथी एक जुडी
हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे
फ़ोडणीचे साहित्य
तेल
क्रमवार मार्गदर्शन:
बाजारात टोफ़ूची तयार पाकिटे तयार मिळतात त्यातील २०० ते २५० ग्राम चे पाकीट घ्यावे. टोफ़ू एका पसरट भांड्यात काढून घ्यावे व पाण्यात बुडवून ठेवावे. (१० मिनिटे. एकदा पाणी बदलावे)
मेथी निवडून घ्यावी. (फ़क्त पाने) बारीक चिरून घ्यावी.
मिरची बारीक कापून घ्यावी.
टोफ़ू पाण्यातून काढून निथळून घ्यावे. मग जोर लावून (त्यावर एखादी ताटली वा पोळपाट ठेवून) त्यातील पाणी शक्य तेवढे काढून टाकावे.
फ़ोडणी साठी तेल गरम करावे. तेल धुरावल्यावर त्यात मोहरी, हळद घालून ज्योत बारीक करावी व त्यात बारीक कापलेल्या मिरच्या घालाव्या.
दहा सेकंदाच्या आत (अन्यथा मिरच्या जळतात) बारीक कापलेली मेथी घालावी. ज्योत थोडी मोठी करून पटापट हलवावे.
ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. दोन मिनिटे झाल्यावर झाकण काढून टोफ़ूचा चुरा घालावा. ज्योत मोठी करून पटापट हलवावे.
ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. मधून मधून हलवत रहावे.
साधारण दहा मिनिटात मेथी शिजते. टोफ़ू त्यासोबतच (तेवढ्याच वेळात) शिजते.
माहितीचा स्रोत:प्रयोग
अधिक टीपा:टोफ़ू हे तब्येतीसाठी चांगले म्हणून खायला सुरुवात केली। आता खायचेच आहे तर प्रयोग करून बघू या उपद्व्यापातून ही कृती मिळाली. टोफ़ूला स्वताची अशी चव नसते. तरीही (त्यामुळे?) काही लोकाना ते नावडण्याची बरीच शक्यता आहे. तरी पहिला प्रयोग करतान सावध रहावे (हे नच आवडल्यास दुसरे काही तयार असो द्यावे).
हे मनोगत वरुण घेतले आहे.