शुक्रवार, १८ जुलै, २००८

मिसी रोटी. प्राजु गुरु, ०४/०१/२००७ - २१:४१.

वाढणी:२-३ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कणिक १ कप
बेसन - १ कप
रवा १/२ वाटी.
मीठ, कोथिंबीर, तेल
आलं, लसूण, मिरची वाटून.
तूर डाळ १/२ वाटी भिजवून भरड वाटून. (हवी असल्यास)
क्रमवार मार्गदर्शन:
वरील सर्व पदार्थ एकत्र करून , त्यात लागेल तेवढे पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे. साधारण अर्धा तास हे मळलेले पीठ झाकून ठेवावे.
त्यानंतर त्याच्या जाड पोळ्या लाटून गरम तव्यावर तेल / तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्याव्या. पोळ्या भाजताना तव्यावर दाबून भाजाव्यात.
नुसत्या तूपा बरोबर सुद्धा खूप छान लागतात. भाजीची गरजच भासत नाही.
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:
या पोळ्या जाड लाटाव्यात कारण, त्याशिवाय रव्याचा कुरकुरीत पणा आणि तूर डाळीचा खुटखुटीतपणा जाणवत नाही.
आम्ही एकदा इथल्या भारतीय दुकानातून फ्रोजन (मराठी शब्द ???) मिसी रोटी आणली होती. ती खाल्यावर मी माझी पाककला पणाला लावून मिसी रोटी बनवली आणि ती त्या फ्रोजन पेक्षा खूपच छान झाली. तुम्ही ही करून बघा आणि आवडली तर प्रतिसाद नक्की पाठवा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.