रविवार, २७ जुलै, २००८

रंगीत पोहे

वाढणी:२-३ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ वाट्या जाडे पोहे, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, पाव वाटी मटार, पाव वाटी स्वीट कॉर्नचे दाणे,
१ टीस्पून आल्याची पेस्ट, २-३ हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, ओलं खोबरं, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य,
चवीपूरते मीठ, साखर, तेल.
क्रमवार मार्गदर्शन:पोहे भिजवून ठेवावेत. पॅनमध्ये तेल गरम करून हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्यांची फोडणी करावी. त्यात मटार आणि स्वीट कॉर्नचे दाणे घालून वाफेवर पाणी ठेवून शिजवावे. मग आल्याची पेस्ट, लिंबूरस, टोमॅटो, पोहे, चवीपूरते मीठ आणि साखर घालून एक वाफ येऊ द्यावी. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओले खोबरे पेरून पोहे गरम गरम सर्व्ह करावेत.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:या पोह्यात हळद घालू नये।
हे मनोगत वरुण घेतले आहे.