मंगळवार, १५ जुलै, २००८

वाटाण्याचा पराठा मंजुषा सोनार सोम, २४/१२/२००७ - ०२:१५.

वाढणी:४ व्यक्ती
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२०० ग्रॅम वाटाण्याचे दाणे
४/५ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
आले-लसूण यांची पेस्ट
जीरे, तेल, मीठ
२५० ग्रॅम कणीक
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम वाटाण्याचे दाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमधून जाडसर काढून घ्याव्यात.
एक पॅन मध्ये २ चमचे तेल घेवून जीरे, आले-लसूण पेस्ट टाकावे.
नंतर वाटाण्याचे जाडसर मिश्रण त्यात टाकावे. एक वाफ आणून घ्यावी.
कणकेत मीठ टाकून नेहेमीच्या पोळीसारखे भिजवावे. कणकेचे गोळे करून वरील मिश्रण त्यात भरून पराठ्यासारखे लाटावे.
तेल टाकून तांबूस रंग येईपर्यंत परठा शेकावा.
सॉस सोबत खायला द्यावा.
माहितीचा स्रोत:माझी आई
अधिक टीपा:याच पद्धतीने थोडा बदल करून वाटाण्याच्या कचोऱ्याही करता येतात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.