मंगळवार, २२ जुलै, २००८

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो।पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण).पण बर्‍याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो.खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल.फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात.
मी सुरुवात करतो
१) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्।येथे ओशो आश्रम तसेच त्यांच्या शिष्यानी तयार केलेली बाग खूपच सुन्दर आहे.आपण पुण्यात आहोत की जपान/युरोप मधे अस प्रश्न पडतो.वर्दळ गर्दी धूळ असे इथे काही नसते.पण पाव भाजी वगैरे स्टॉल सिद्धा नाहीत.
२) रेल्वे म्युझीयम : कर्वे रोड वर संगम प्रेस च्या रस्त्यावर। रेल्वे च्या मिनीएचर मॉडेल चे झकास म्युझीअम
३)बनेश्वर : पुणे बेन्गलोर रस्त्यावर साधारण कात्रज सोडल्यावर नसरापुर/भोर जवळ उजव्या हाताला शंकराचे सुन्दर मन्दीर आहे।बागपण छान आहे
४) बनेश्वर च्या फाट्याच्या जवळ डाव्याबाजुला बालाजीचे मंदीर आहे।
५-६ किमी तरी नक्कीच असेल। केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.
५) ठोसेघरः साधारण पुण्यापासून सातार्‍याकडे १००/१२५ कि।मी. आहे.
६) ताम्हीणी

पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते॥ भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं। आणि जोडीला वडापाव अन् भजी.चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते॥ भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं। आणि जोडीला वडापाव अन् भजी.
अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल)।
७) मुळशी

ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.
८) पावसाळ्यातच..
वरंधा घाटात जायचं॥ आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं।
शिवथरघळ
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो। येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो.
मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते। पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे.
९) संधिपाद प्राणि संग्रहालय......
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे। तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.
१०) अ ) कार्ला -
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे।
रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते। फक्त ५० कि.मी
पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे।
ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण। (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी.

११) मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच..
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर
पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि।मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!!
चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच....
परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि।मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान.
पुरंदर मस्तच। पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे.
पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे
सिंहगड रस्त्यावर पु।ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.

१२) बेडसे
भुलेश्वर
त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ
शिरवळची लेणी - ५५
मस्तानी तलाव - २५ किमी
भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी
कवडी - पक्षी निरीक्षणासाठी
कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११०
पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी

चाकणचा किल्ला
चाकणजवळचे वराह मंदिर
सोनोरीचा वाडा व भुयार
सोनोरीचा किल्ला - मल्हारगड
वाईजवळचा घाट - मेणवली
निघोजची रांजणखळगी
वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी
१३) सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे
१४) मावळसृष्टी!
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा। सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
१५) हे घ्या...
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी)

नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा।बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय.

गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत।चिंता नको.

अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा।इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय.

कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये।
16) १। नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते.

२. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.