सोमवार, २१ जुलै, २००८

सफरचंदाची मिठाई: ऍपल पाय स्वाती दिनेश गुरु, २१/०९/२००६ - १२:१७.

सफरचंदाची मिठाई: ऍपल पाय स्वाती दिनेश गुरु, २१/०९/२००६ - १२:१७।
वाढणी:४/५ जणांसाठी (कसेबसे) पुरेसे
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५/६ सफरचंदे,३/४ मेज चमचे साखर(टेबल स्पून),मूठभर बेदाणे
१००ग्राम मैदा,६० ग्राम लोणी,६०ग्राम साखर,१चिमूट मीठ
१चहाचा चमचा दालचिनी पावडर,बदाम तुकडे १ मूठ
क्रमवार मार्गदर्शन:
जर्मनी मध्ये ,त्यात ही हेसन मध्ये सफरचंदे फार..प्रत्येकाच्याच बागेत लगडलेली,भाराने वाकलेली झाडे!(कुंपणात जाऊन तोडण्याच्या कोणी फंदात पडत नसल्याने )त्यामुळे सफरचंदाचे पदार्थ भरपूर!
सफरचंदांची साले काढणे,लहान तुकडे करणे,त्यात ३/४ चमचे साखर + बेदाणे+बदाम तुकडे घालावे.हे मिश्रण बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे पसरुन ठेवावे.
मैदा+साखर+लोणी+मीठ + दालचिनी पावडर एकत्र करुन चांगले मळावे. त्याच्या बारीक,बारीक गोळ्या,गुठळ्या कराव्या,व त्यांनी बेकिंग ट्रे मधील सफरचंदांचे मिश्रण झाकून टाकावे.
१८० अंश से. तापमानावर ३०-३५ मिनिटे बेक करावे.
वॅनिला आईस क्रीम बरोबर (कॅलरींचा विचार न करता) खावे.


माहितीचा स्रोत:माझी शेजीबाई: त्सेंटा आजी
अधिक टीपा:
गरम/कोमट/गार कसाही चांगला लागतो.
वॅनिला आईस ऐवजी व्हीप्ड क्रीम घालून पण छान लागते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.