शुक्रवार, १८ जुलै, २००८

अननसाची चटणी जान्हवी देशपांडे शुक्र, १७/११/२००६ - ०७:५९.

वाढणी:३-४
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
एका अननसाच्या बारीक फोडी
बडीसोप,जीरे,मोहरी,मेथ्या- प्रत्येकी २ लहान चमचे
साखर १ चमचा
चवीनुसार मीठ,तिखट
फोडणीसाठी तेल, हिंग
पाणी- अर्धा कप
क्रमवार मार्गदर्शन:
मसाल्यासाठी बडीसोप,जीरे,मोहरी,मेथ्या प्रत्येकी एक चमचा कोरड्या भाजून त्याची पुड करून घेणे. एका पात्रात फोडणीसाठी तेल तापवुन उरलेल्या मेथ्या,बडीसोप,जीरे,मोहरी,हिंग टाकणे त्यात अननसाच्या बारिक फोडी टाकणे,३-४ मिनीट परतणे. त्यात मसाला, साखर,तिखट,मीठ,पाणी टाकुन हलवुन झाकण लावुन एक उकळी देणे जेणे करून अननस शिजला पाहिजे,हवे असल्यास अजुन थोडे पाणी टाकणे.

चटणी मिळुन येण्यासाठी मी त्यात एक चमचा सातुचे पीठ टाकुन थोड्यावेळ शिजवुन पाहीले, हा प्रयोग एकदम फळास आला. याऐवजी मैदा पाण्यात कालवुन टाकल्यास चालेल,पण मैद्याची (पिठाची)चव जावुन अननसात मिसळण्यासाठी छान शिजवावे .


माहितीचा स्रोत:मैत्रीण
अधिक टीपा:गरमा गरम चटणी पोळी किंवा पालक पराठे/पत्त्ताकोबी पराठे सोबत छान लागते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.