मंगळवार, १५ जुलै, २००८

नारळाच्या दुधातली बटाट्याची भाजी गौरीदिल्ली शुक्र, ३०/११/२००७ - १५:३२.

वाढणी:३-४
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उकडलेले बटाटे ५-६
फ़ोड्णी- तूप, जिरे, मोहरी ,हिन्ग, हळद
चिन्च, गुळ, लाल मिरच्या, धणे पावडर, गरम मसाला, तिखट,मीठ
नारळाचे दुध, कोथिम्बीर
क्रमवार मार्गदर्शन:
सर्वप्रथम तूपात जिरे, मोहरी ,हिन्ग, हळद फ़ोडणी करा व त्यात ५-६ उकडलेले बटाटे घाला.
त्यात कोळलेली चिन्च, गुळ, मीठ,धणे पावडर,गरम मसाला आणि तिखट ( बेताने जसे हवे असेल तसे) घालावे.त्यात थोडे गरम पाणी घालून चांगली शिजवून घ्यावे. चिन्च बर्यापैकी घालावी म्हणजे थोडिशी आंबट गोड चव येते भाजीला.
गॅस बंद करून मगच त्यात नारळाचे दुध घालावे. चवीला मीठ राहिलेच की.
वरून कोथिम्बीर पेरावी. मस्त खमंग लागते भाजी.
शुद्धलेखन सुधारणेचे काम सध्या चालू असल्यामूळे चुकांबद्दल क्शमा असावी
माहितीचा स्रोत:मैत्रिण - व्रुशाली बोडस-राजवाडे
अधिक टीपा:नारळाचे दुध जास्त गरम होउ देऊ नये नाहीतर दुध फुटते।
हे मनोगत वरुण घेतले आहे.