मंगळवार, १५ जुलै, २००८

टाईमपास बी. बी. सी. मंगळ, २०/०५/२००८ - १८:५४.

वाढणी:चौघांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पातळ पोहे २ वाट्या
१ कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
कोथिंबीर
४/५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
लिंबाचा रस, मीठ, साखर चवीप्रमाणे
क्रमवार मार्गदर्शन:
१. प्रथम पातळ पोह्यांवर पाण्याचा हबका मारून किंचित ओले करून घ्यावेत. (जास्त ओले करू नये. )
२. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून २ मिनिटे ठेवावे.
३. आता त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला.
४. व्यवस्थित कालवून खायला द्या.
माहितीचा स्रोत:माझी मावसवहिनी (मावस भावाची बायको)
अधिक टीपा:
१. पोह्यांवर जास्त पाणी मारून खूप ओले करू नयेत. म्हणजे ते थोडे चिवट होतील.
२. आवडत असल्यास बारीक शेव भुरभूरावी.
३. हे पोहे खाताना थोडे चिवट लागतात, त्यामुळे खायला वेळ जास्त लागतो.
४। चिवट लागत असल्यामुळेच त्याला "टाईमपास" नाव दिले.

हे मनोगत वरुण घेतले आहे.