बुधवार, १६ जुलै, २००८

पिकलेल्या पेरुचे सरबत माधव कुळकर्णी शनि, ०७/०४/२००७ - २१:५८.

वाढणी:चार जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दोन मोठे पेरु
साखर-एक मोठी वाटी
लिंबू - एक मध्यम आकाराचे
चवीपुरते मीठ व चाट मसाला.
एक लिटर थंड पाणी - व बर्फाचे तुकडे.
क्रमवार मार्गदर्शन:चांगल्या पिकलेल्या २ पेरुंची साल हलक्या हाताने काढून (अगदी वर वरची) त्यांचे उभे चार तुकडे करुन शक्य तितक्या बिया हाताने वेगळ्या काढून घ्याव्यात. कुकरमध्ये (दोन शिट्ट्या) हे तुकडे मऊ होण्याइतपत उकडून घ्यावेत. मिक्सर मध्ये साखर, पेरुचे तुकडे व लिंबाचा रस एकत्र फिरवून घ्यावा. तयार झालेला पल्प (लगदा) काढून एका मोठ्या भांड्यात ( एक लिटर ) पाण्यासोबत मिसळावा. मिसळताना हँड मिक्सरने एकत्र करुन घ्यावा. सरबत देताना मीठ व चाट मसाला एकत्र करुन द्यावा.उपवास असल्यास चाट मसाला घालू नये.
माहितीचा स्रोत:सौ.
अधिक टीपा:
हा लगदा बरेच दिवस फ्रिजर मध्ये टिकतो व वेळेवर पाहूणे आल्यास फक्त पाण्यात मिसळून लगेच सरबत देता येते.
वरची साले व बीया उकडण्यापूर्वीच काढल्यास गाळण्याची आवश्यकत: पडत नाही अन्यथा साले व बियांसकट उकडल्यास गाळून घेण्यास विसरु नये।
हे मनोगत वरुण घेतले आहे.