मंगळवार, १५ जुलै, २००८

वासंतिक पेय स्वाती दिनेश मंगळ, ०८/०४/२००८ - १२:३२.

वाढणी:गैरलागू
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५,६ कैर्‍या
साधारण ३ वाट्या साखर (कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे)
मीठ,केशर,वेलदोडे
क्रमवार मार्गदर्शन:प्रकार-१कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो. उन्हातान्हातून घरी आल्यावर त्यातील २ चमचे बलक एका पेल्यात घेऊन थंड पाणी घालावे व चांगले ढवळावे आणि आस्वाद घेत प्यावे.प्रकार-२साहित्य वरील प्रमाणेच.कैर्‍या किसाव्यात व थोड्या पाण्यात कोळाव्यात. हे पाणी गाळून घ्यावे.त्यात वेलदोडेपूड,केशर, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी.हे पाणी बाटलीत भरून ४,५ दिवस ठेवता येते व पन्हे प्यायचे असेल तेव्हा बाटली चांगली हलवून त्यातील पाव ते अर्धा पेला अर्क घालावा. उरलेला पेला पाणी घालावे, ढवळले की पन्हे तयार!
माहितीचा स्रोत:सौ‌.आई.
अधिक टीपा:
१.साखरेऐवजी गूळही घालता येईल.गूळाच्या पन्ह्याला एक वेगळाच स्वाद असतो तो बरेच जणांना आवडतो.
२.पाण्याऐवजी सोडा घातला तरी मस्त पन्हे तयार होते. कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही त्यांना हे पन्हे जास्त आवडते.

हे मनोगत वरुण घेतले आहे.