शनिवार, २६ जुलै, २००८

पास्ता- टोमॅटो सॉस बरोबर

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
स्पॅगेटी, साधारण शंभर ग्राम, ऑलिव्ह तेल, लसूण -चकत्या करुन,एखादी सुकी लाल मिरची(जसा तिखट्पणा आवडत
भोपळी मिरच्या- शक्यतोवर रंगीत, झुकिनी-चकत्या करुन, टोमॅटो- शक्यतो रस, बेजीलची ताजी पानं, किसलेलं च
क्रमवार मार्गदर्शन:
सर्वप्रथम पाणी उकळत ठेवून त्यात अर्धा चमचा मीठ व चमचाभर ऑलिव्ह तेल घालावे. पाणी उकळलं की त्यात स्पॅगेटी टाकावी. (त्यावर लिहिल्याप्रमाणे शिजवण्याची वेळ ठरवावी.) शिजलेली दिसली की जाळीदार भांड्यात घालून गार पाण्याखाली धरुन निथळावी.
पसरट भांड्यात(फ्राय पॅन) मध्ये ऑलिव्ह तेल घेऊन जरा गरम झाल्यावर लसणीच्या चकत्या परतून घ्याव्यात. त्यातच लाल सुक्या मिरचीचे तुकडे करुन टाकावेत. त्यावर सर्व भाज्या टाकून झाकण घालून वाफ काढावी. मग ह्यात टोमॅटोचा रस घालावा व मिश्रण जरा दाट होईपर्यंत शिजवावे. मग त्यात किसलेले चीज व मीठ घालून शिजवलेली स्पॅगेटी घालावी. वरुन बेजीलची पाने चिरुन घालावीत.
माहितीचा स्रोत:मी स्वतः शोधून काढलेली कृती. आणि आजवर अनेकदा करुन पाहिलेलीही आहे.
अधिक टीपा:स्पेग़ेटी बरोबर कोणतंही सलाड, किंवा सूप, गार्लिक ब्रेड चांगला लागतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.