सोमवार, २१ जुलै, २००८

कटलेट (भाजीशिवाय) सायली जोशी रवि, २७/०८/२००६ - ०५:१८.

वाढणी:१८-२० कटलेट
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५ मध्यम आकाराचे बटाटे
२ वाट्या जाड पोहे
अर्धी वाटी बेसन
४-५ मिरच्या,ब्रेड क्रम १ वाटी
मीठ, गोडा मसाला,आलं-लसुण पेस्ट,खायचा सोडा (हवा असल्यास)
तळण्याकरता तेल
क्रमवार मार्गदर्शन:
बटाटे उकडवून व किसुन घ्यावेत घ्यावेत. त्यात पोहे भिजवुन घालावेत. त्यातच अर्धी वाटी बेसन,अर्धा चमचा गोडा मसाला, आलं-लसुण पेस्ट,चवीपुरते मीठ,( आवडत असल्यास खायचा सोडा चिमुटभर ), मिरच्यांचे तुकडे असं सगळं घालावे. वाटल्यास चिमुटभर लाल तिखट घालावे.
ब्रेड क्रम म्हणजे bread च्या २ slices toaster मधुन ३ मिनिटांकरता ठेऊन काढुन चुरुन वरील मिश्रणात घालावे. हवे त्या आकाराचे कटलेट करुन घ्यावेत व deep fry करावेत.
माहितीचा स्रोत:सायली जोशी
अधिक टीपा:आयत्यावेळी पाहुणे आल्यास चवदार चटपटीत अशी ही भाजी शिवायची ही कटलेट छान लागतात व भाज्यांची चिरा-चिरी नसल्याने अगदी लवकर होतात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.