सोमवार, २१ जुलै, २००८

मेवा वडी मन्जुशा रवि, २३/०७/२००६ - १२:०४.

वाढणी:आठ -दहा
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
एक वाटी कुठलाही एक किन्वा मिश्र मेवा(बारीक/जाडसर पूड केलेला), एक वाटी भाजलेला रवा, २ वाट्या दूध चार वाट्या साखर
आणि वेलदोडा पूड
क्रमवार मार्गदर्शन:एका जाड बुडाच्या भान्ड्यात वरील सगळे जिन्नस एकत्र मिसळून मन्द आचेवर शिजत ठेवावे. एका थाळीला तुप लावून ठेवावे. वरील मिश्रण घट्ट झाल्यावर थाळीत ओतावे. आवडीप्रमाणे वड्या कापाव्या.
माहितीचा स्रोत:मावशी
अधिक टीपा:पाक ज्यांना जमत नाही त्यान्च्याकरिता (आता तरी अस कुणीही म्हणू नये कारण प्रभाकरदादानी पाक करण्याची कृती इतकी छान दिलीये की पाक बिघडण्याची शक्यताच नाही) नुसत्या पिस्त्याच्या केल्यातर रंग छान येतो। मिश्रण वडी योग्य झालंय का पाहण्याकरिता घट्ट होत आल्यावर चमच्याने थोडंसं मिश्रण ताटलीत टाकून पाहावं पसरलं नाही म्हणजे झालंय अस समजाव
हे मनोगत वरुण घेतले आहे.