शनिवार, २६ जुलै, २००८

आम !

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ मध्यम आकाराची कैरी
३/४ कांदे - पांढरे असल्यास उत्तम
२ हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी कोथंबीर
थोडासा नारळ किसून
हळद, हिंग पावडर, मिरची पावडर, तेल (टेबलस्पून), साखर, मीठ, हळद
क्रमवार मार्गदर्शन:
कांदे व हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावे.
कैरी व नारळ किसून घ्यावा - नारळ साधारण अर्धी वाटी (आमटीची)
हे पदार्थ नीट एकजीव करून घ्यावेत.
वरून कच्चे तेल (१ टे. स्पून), हिंग पावडर व हळद - चिमूटभर,
साखर, तिखट व मीठ (आवडीनुसार) टाकणे.
माहितीचा स्रोत:आई -
अधिक टीपा:
मुगाच्या डाळीच्या खिचडी बरोबर छान लागतो !
हे मनोगत वरुण घेतले आहे.