सोमवार, २८ जुलै, २००८

चहा

वाढणी:२ चहाबाजां साठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१-१/४ कप पाणी
२ चमचे साखर
१-१/२ चमचे चहा
३/४ कप दुध
क्रमवार मार्गदर्शन:
एक स्वच्छ लहान आकाराचे भांडे घ्यावे व ते शेगडी वर ठेवावे. भांड्यात १ कप पाणी टाकून ते शेगडी वर ठेवावे. शेगडी सुरु करावी. (गॅस शेगडी असल्यास मध्यम आचेवर. विजेची शेगडी असल्यास अति-उष्ण आचेवर.) पाणी थोडे गरम झाल्यावर त्यात १-१/२ चमचे चहा टाकावा. शेगडीची आच कमी करावी. मंद आचेवर चहा १५ सेकंद उकळुन भांड्यावर झाकण ठेवावे. ३० सेकंद थांबुन त्यात साखर व दुध टाकावे. मंद आचेवर चहाला ऊकळी येई पर्यंत थांबावे व शेगडी बंद करावी.
चहा २ पेल्यांमधे गाळुन चहाचा आस्वाद घ्यावा.


माहितीचा स्रोत:आई, अनेक दर्दी चहाप्रेमी व स्व-प्रयोग.
अधिक टीपा:
१. मसाला चहासाठीः १/२ चमचा चहाचा तयार मसाला गरम पाण्यात चहा टाकण्या आधी टाका. (मसाला नसल्यासः १ मीरे, १ वेलदोडा, १ चीमुट सुंठ / थोडे आले, १ चीमुट दालचिनी)
२. चहा सोबत खाण्यासाठी काही च्याऊ-म्याऊ असल्यास अतिऊत्तम.
३. गप्पा मारायला मीत्र असतील तर चहा अमृततुल्य लागतो.
४. तुम्ही भारतात असल्यास एवढे कष्ट करण्या एवजी टपरी वर जाऊन प्यावा.

दर्दी वाचकां कडुन अधीक माहीतीची अपेक्षा करतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.