सोमवार, २८ जुलै, २००८

हमखास डोसा

वाढणी:८ ते १० डोसे
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१वाटी उड्दाची डाळ
१-१/२ कींवा २वाट्या तांदुळ
१/२ चमचा मेथी दाणे
मीठ चवीपुरते
तेल वा बटर
क्रमवार मार्गदर्शन:डाळ , तांदुळ , मेथी ८ तास भिजवून बारीक वाटून घ्यावी. पीठ भज्याच्या पीठापेक्षा पातळ असावे. हे पीठ १० ते १२ तास ठेवून नंतर लोखंडी तव्यावर पातळ डोसे घालावेत.तेल वा बटर सगळीकडे टाकावे. वाटल्यास उलटावे. अग्नि प्रखर असावा.डोश्याचा रंग गुलाबी झाल्यावर डोसा काढावा.
अधिक टीपा:
लोखंडी तवा तेल लावून नूसताच १० ते १२ मि. तापवावा. असे २-३ दा करावे. हा तवा फ़क्त साबणाने धूउन फ़क्त डोश्यांसाठीच वापरावा.डोसा घालताना फ़ार घाई करू नये. डोसा घालण्यासाठी लांब पळी वापरावी.
हिंग व जीरे घातल्यास चव छान लागते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.