मंगळवार, १५ जुलै, २००८

तव्यावरचा शेंगदाणे-मिरचीचा झटपट ठेचा. मंजुषा सोनार सोम, २६/११/२००७ - ०२:५७.

वाढणी:२
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
सात-आठ मिरच्या
मूठभर शेंगदाणे
लसणाच्या चार-पाच पाकळ्या
जीरे
दोन चमचे तेल
कोथिंबीर, मीठ
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम मिरच्या स्व्च्छ धुवून बारिक चिराव्यात.
लसूण पाकळ्या चिराव्यात.
तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जीरे व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जीरे शेवटी टकल्याने ते जळत नाही.
मग मीठ टाकून त्याला जाडेभरडे ठेचावे.
हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
तोंडी लावायला अगदी चवदार !!
माहितीचा स्रोत:मी स्वत:
अधिक टीपा:मिक्सर वापरू नये। ठेचलेलाच छान लागतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.