मंगळवार, २२ जुलै, २००८

शेजवान सॉस. किर्ती शुक्र, २७/०१/२००६ - ०१:००.

पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
लसून १०० ग्रॅम, आलं १०० ग्रॅम, हिरव्या मिरच्या ५
सेलेरी १ टे. स्पून, टॉमेटो सॉस १/२ वाटी, सोयसॉस १ ट. स्पून
चिली सॉस २ टे. स्पून, व्हिनेगर १ टे. स्पून
काश्मिरी मिरची पावडर ६ टे. स्पून, साखर १ टे. स्पून, लालरंग पाव टे. स्पून
मीठ १ टे. स्पून, अजिनोमोटो १ टे. स्पून
तेल पाऊण कप
क्रमवार मार्गदर्शन:
तेल गरम करून गार करणे.व्हिनेगर व तेल सोडून सर्व साहित्य एकत्र करणे.वरून तेल आणि मग व्हिनेगर घालणे.चवीनूसार मीठ घालावे.फ़्राईड राईस आणि नूडल्स मधे घालून खाणे.
माहितीचा स्रोत:बहिण.
अधिक टीपा:शेजवान सॉस जेवढा मुरेल तेव्हढा चांगला लागतो।चायनीज पदार्थ शेजवान स्टाईलने करण्यासाठी हा सॉस वापरावा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.