बुधवार, १६ जुलै, २००८

नारळांबावडी मन्जुशा सोम, ११/०६/२००७ - १५:५७.

वाढणी:आपल्या आवडीनुसार
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाट्या नारळाचा चव, १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी दूध, २ वाट्या
साखर, अर्धा चमचा तूप
क्रमवार मार्गदर्शन:एका पसरट कढईत वरील सर्व जिन्नस ( तूप सोडून) एकत्र कालवून गॅसवर शिजत ठेवावे. आच मंदच ठेवावी म्हणजे वडीचा रंग छान दिसतो. मिश्रण घट्ट होईस्तोवर सतत ढवळत राहावे. एका तूप लावलेल्या ताटलीत हे मिश्रण वाटीच्या साहाय्याने पसरवावे. चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकारात आपल्या आवडीनुसार वड्या कापाव्यात.
माहितीचा स्रोत:दुरदर्शन पाककृती कार्यक्रम
अधिक टीपा:दुरदर्शंनच्या कार्यक्रमात ही पाककृती दाखवली होती त्यात मी सायीच्या ऐवजी दूध घेतले व चरबीचे प्रमाण कमी केले। आंबा शक्यतो हापूस किंवा दशहरी घ्यावा.
हे मनोगत वरुण घेतले आहे.