शुक्रवार, १८ जुलै, २००८

पौष्टिक लाडू जान्हवी देशपांडे मंगळ, ०५/१२/२००६ - २०:३४.

वाढणी:५-६
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उडीद डाळ- २ वाट्या
पिठी साखर-१ वाटी किंवा चवीनुसार कमी/जास्त
सुका मेवा-काजु,किसमिस,बदाम,पिस्ते- अर्ध्या वाटीला थोडे जास्त
सुकं खोबर- अर्धी वाटी
जायफळ-विलायची पूड- पाव चमचा,केशर- चिमुटभर
लाडु बांधायला तूप- अर्धी वाटी
क्रमवार मार्गदर्शन:उडीद डाळ एका जाड बुडाच्या पातेल्यात/भांड्यात टाकून मंद आचेवर कोरडी भाजून घ्यावी,सारखे हलवावे,जेणेकरून डाळ सगळीकडुन भाजली जाईल व करपणार नाही. १०-१५ मिनीटांनी डाळीचा रंग बदलेल व छान खरपुस वास आल्यावर गॅस बंद करणे. भाजलेली डाळ मिक्सरमधून बारीक दळून घ्यावी, त्यात केशर व किसमिस सोडून इतर सुका मेवा,खोबर,साखर,जायफळ-विलायची पूड टाकून अजुन एकदा मिक्सरमधुन काढावी. एका पसरट भांड्यात किंवा ताटात हे मिश्रण घेवुन त्यात किसमिस,केशर, थोडे थोडे करून तूप टाकुन लाडू बांधावेत. आवश्यकतेनुसार तुपाचे प्रमाण कमी/जास्त करावे.
माहितीचा स्रोत:माझी आई
अधिक टीपा:
माझी आई आम्हा सर्वांसाठी हिवाळ्यात पौष्टिक लाडू करायची,रोज पहाटे एक लाडू नाश्ताबरोबर असायचा.लहान मुलांच्या तब्येतीसाठी सुकामेवा जास्त टाकल्यास सुकामेवा त्यांच्या खाण्यात सहजपणे येतो.
हे लाडू नावाप्रमाणे पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर चवीलापण फार सुंदर लागतात.
इथे अमेरिकेत उन्हाळ्याचे ३-४ महिने सोडल्यास इतर दिवस भारतातल्या हिवाळ्यासारखी थंडी असते, त्यामुळे एरवी पाहुण्यांच्या आदरतीथ्याला पण हे लाडू करून वाहवा मिळवायचा माझा हा एक मार्ग!!
हे मनोगत वरुण घेतले आहे.