वाढणी:अन्दाजाने..
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ नारळ खोवुन, २ वाट्या गुळ किन्वा साखर,
वेलदोड्याची पुड, २ वाट्या रवा,
दुध, तळण्याकरता तेल
क्रमवार मार्गदर्शन:
१. प्रथम मोदकामध्ये भरण्यास सारण करून घ्यावे.२. त्याकरता खोवलेला नारळ आणि गुळ एकत्र करून शिजवून घ्यावे.३. सारण एकजिव जाले पाहिजे चांगले.त्यात वेलदोड्याची पुड टाकावी.४. २ वाट्या रवा दुधात भिजवून घ्यावा. सैल भिजवू नये. शक्यतो रवा ५-६ तास आधी भिजवून थेवावा.५. मोदक करण्या आधी भिजलेला रवा चांगला मळून घ्यावा.६. रव्याच्या लाट्या बनवून घ्याव्यात.७. एकेक लाटी घेवून पुरी एवधी लाटून त्यात सारण भरावे. आणि मोदकचे तोण्ड बंद करावे.(चित्रात दाखविले तसे)८. असे सगळे मोदक बनवून घ्यावेत. आणि मंद आचेवर गोल्डन होईपर्यंत तळून घ्यावेत.९. गरम, थंड कसेही खायला छान लगतात.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:
गुळाएवजी साखर वापरली तरी चालेल पण गुळाचे सारण खमंग लागते.
सारणामध्ये काजु, मनुका, घालून चव अजून खुलवता येते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.