बुधवार, १६ जुलै, २००८

कमी तेलाचे पराठें शिल्पाजोशी सोम, ३०/०४/२००७ - १४:४६.

वाढणी:१० पराठें
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मेथी/पालक/गाजर/ज्याचे पराठें करायचे असतील तें,
३ वाट्या कणीक,
मीठ, तिखट, १० लसूण पाकळ्या, २ चमचें तेल,
क्रमवार मार्गदर्शन:
मेथी/पालक/गाजर किंवा ज्याचेही पराठें करायचे असतील तें बारीक चिरून कढईत वाफवावें. ह्यात मीठ, तिखट चवी प्रमाणे आणि लसणी चे वाटण घालावे. मिश्रण गरम असतानाच त्यात कणीक घालावी आणि चमच्याने छान एकजीव करावे.
मिश्रण थंड झाल्यावर हे कणकी च्या पीठा प्रमाणे मळून घ्यावे. याच्या लाट्या करून पराठे लाटावे आणि शक्य तेव्हढ्या कमी तेला वर भाजावे. हे पराठे भाजतानां एका पराठ्या साठी २ थेंब तेल सुद्धा पुरतं.
माहितीचा स्रोत:माझी नणंद
अधिक टीपा:वजन कमी करणार्यां साठी उत्तम। यांच पद्धती ने मुळा, फ़्लॉवर चे पण पराठे होतात. मात्र मग ह्यात डाळीचे पीठ, कोथिंबीर हे पण घालावे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.