सोमवार, २१ जुलै, २००८

गुलखंड स्वाती दिनेश बुध, ०४/१०/२००६ - १५:५८.

गुलखंड स्वाती दिनेश बुध, ०४/१०/२००६ - १५:५८।

वाढणी:२/३ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
स्पाइझ क्वार्क ४०%फॅटवाला /चक्का ५००ग्राम,२५०/३०० ग्राम साखर,
१ टेबल स्पून गुलकंद,बदाम/काजूतुकडे १टेबल स्पून(वैकल्पिक)
क्रमवार मार्गदर्शन:
इथे speisequark नावाचे जे दही मिळते त्याला आम्ही "जर्मन चक्का" असे नांव दिले आहे!
स्पाईझ क्वार्क मध्ये साखर मिसळा,बदाम/काजू तुकडे घाला.
गुलकंद घाला‌‌. गुलखंड तयार!
पोळी/पुरी बरोबर खा.वेगळी चव छान लागते.
माहितीचा स्रोत:नवरा
अधिक टीपा:
काल दसरा होता.म्हणून श्रीखंड करायचे ठरवले.दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो‌. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला!आणि गुलखंड असे बारसे करुन आम्ही खाल्ले.
आपल्याच शोधावर खुष होऊन मनोगतीं साठी पा.कृ. दिली आहे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.