सोमवार, २१ जुलै, २००८

अप्पालू रामची आई शनि, १९/०७/२००८ - ००:४२.

वाढणी: २ जण
पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी साखर
२ वाटी गव्हाचे पीठ
२ चिमटी वेलदोडा पुड
२ चिमटी मीठ
२ चमचे तेल
क्रमवार मार्गदर्शन:
एका भांड्यात १ वाटी साखर, वेलदोडा पुड, मीठ, तेल आणि १ वाटी पाणी गॅसवर ठेवणे, उकळी आल्यावर त्यात मावेल येवढी कणीक टाकून छान मिसळवणे. १ वाफ काढल्यावर गॅस बंद करणे. हे मिश्रण गार झाल्यावर तेलाच्या हाताने मळुण घेणे, ह्यच्या छोट्या छोट्या जाड पुर्या करून तळणे.
माहितीचा स्रोत: माझ्या सासुबाई
अधिक टीपा: नुसते पण खायला छान लागतात।
हे मनोगत वरुण घेतले आहे.