रविवार, २७ जुलै, २००८

सनातन हिंदु धर्म चा ब्लॉग

लोकहो,

नुकताच सनातन हिंदु धर्म ब्लॉग वाचनात आला। आपल्या धर्मातील विविध गोष्टींची आंतरजालावर शास्त्रोक्त माहिती देणारा हा ब्लॉग वाचून आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद झाला. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ते फार महान कार्य करीत आहेत.

आज परिस्थिती अशी आहे की पाश्चात्यांच्या अंधानुकरणाने तरूण पिढी आपली आर्य सनातन वैदिक संस्कृतीच हरवून बसते आहे। अनेकदा असा अनुभव येतो की घरातल्या कर्त्या लोकांना सुद्धा अनेक गोष्टी माहित नसतात. शास्त्र नेमके काय सांगते हे जाणून जीवन जगणे अगत्याचे आहे.

हरवलेले दुवे पुढील पिढीला सुपूर्त करण्याचे काम हे सनातन हिंदु धर्म ब्लॉगकार करीत आहे। ही बाब आमच्यासाठी अवश्यमेव मोलाची आहे.

सनातन हिंदु धर्माच्या ब्लॉगकारांना आमच्या हार्दिक शुभेच्छा। हा ब्लॉग सर्व मराठी ब्लॉग वाचकांनी आपल्या आवडत्या ब्लॉगांच्या यादीत चिन्हांकित करून ठेवावा.

सनातन हिंदु धर्म ब्लॉगाची जोडणी खाली दिली आहे। सर्व हिंदु धर्मीयांनी या ब्लॉगावरून मिळणार्‍या माहितीचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

http://sanatanhindudharma।blogspot.com/

आपला,
(शुभचिंतक) ओंकार पुरंदरे