शनिवार, २६ जुलै, २००८

सिमलामसाला

वाढणी:२ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
सिमला उर्फ ढब्बू मिरची २ मोठ्या(जाड्या)
लाल तिखट १ चमचा, धने-जीरे पावडर १ चमचा, गरम/गोडा मसाला १ चमचा,
दाण्याचे कूट, ओला नारळ, चिरलेली कोथिंबीर प्रत्येकी अर्धी वाटी
चिंचेचा दाट रस अर्धी वाटी, गूळ (छोट्या लिंबाएवढा)
मीठ
तेल, मोहोरी, हिंग, हळद (फोडणीसाठी)
क्रमवार मार्गदर्शन:
सिमला उर्फ ढब्बू मिरची बारीक चिरणे. नेहमीपेक्षा तेल थोडे जास्त घेवून तेलाच्या फोडणीमधे चिरलेली सिमला मिरची घालून ३-४ वाफांमधे शिजवून घेणे. नंतर त्यात लाल तिखट, धने-जीरे पूड, गरम किंवा गोडा मसाला, गूळ, चिंचेचे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. नंतर त्यात कोथिंबीर, ओला नारळ, दाण्याचे कूट, घालुन परत १-२ वेळा वाफ देवून परतणे.
अशी ही आंबट-गोड भाजी ज्वारीच्या किंवा तांदुळाच्या भाकरीबरोबर चांगली लागते, शिवाय नुसती खायला पण छान लागते.
रोहिणी
माहितीचा स्रोत:स्वानुभव
हे मनोगत वरुण घेतले आहे.