शनिवार, २६ जुलै, २००८

कोल्हापुरी उसळ

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दोन उकडलेले बटाटे
एक कप मोड आलेली मटकी, अर्धा कप भिजत घातलेले सफेद व हिरवे वाटाणे
प्रत्येकी एक चमचा लसूण व आलं पेस्ट
एक लिंबू, एक चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 150 ग्रॅम गोडंतेल
प्रत्येकी एक चमचा धणा पावडर, हळद पावडर व गरम मसाला
दोन चमचे मिरची पावडर, दोन टोमॅटो व दोन कांदे
क्रमवार मार्गदर्शन:
१. प्रथम मटकी, सफेद व हिरवे वाटाणे चार ते पाच तास गरम पाण्यात भिजत ठेवावेत.
२. त्यानंतर पाणी फेकून मटकी व वाटाणे रुमालात बांधून ठेवावेत. एका दिवसात मोड येतात.
३. एका पातेल्यात तेल गरम करावं. त्यात कांदा बारीक चिरून परतावा.
४. कांदा लालसर झाला की त्यात राई, जिरं, हळद पावडर, धणा पावडर, आलं व लसूण पेस्ट घालावी.
५. मसाला चांगला भाजल्यावर त्यात गरम मसाला पावडर, बारीक चिरलेले टोमॅटो व भिजवलेली मटकी व वाटाणे घालावेत.
६. दोन कप पाणी घालून मटकी व वाटाणे शिजेपर्यंत उकळावे. उसळ शिजल्यावर त्यात लिंबू पिळावं.
अशी ही गरमागरम व झणझणीत उसळ फारच रुचकर लागते. उसळ जर जास्तच तिखट वाटल्यास त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे व फरसाण घालून घालतात. त्यालाच 'मिसळ' म्हणतात
माहितीचा स्रोत:स्वानुभव
हे मनोगत वरुण घेतले आहे.