मंगळवार, २२ जुलै, २००८

लोण्याची पोळी मन्जुशा शनि, २०/०५/२००६ - ०६:४७.

वाढणी:आवडीवर अवलन्बून
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पारीसाठी - कणिक, चवीला मीठ, मोहन
सारण - एक वाटी लोणी, एक वाटी भाजलेली पीठी, तीन वाट्या पीठी साखर
र सारण सैल वाट्ल्यास पीठीसाखर मिसळावी.
क्रमवार मार्गदर्शन:कणीक मोहन व मीठ घालून पोळ्याकरिता भिजवितो त्याप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी. सारणाचे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यावे. कणकेच्या दीडपट सारण त्यात भरावे हलक्या हाताने पोळ्या लाटाव्या. साधारण २० पोळ्या होतात. २-३ दिवस टिकतात. आधी करून ठेवता येतात. मुलांना आवडतात.
माहितीचा स्रोत:मावशी
अधिक टीपा:गुळची पोळी, पुरणाची पोळी करणे कला आहे। सवयीनी हे कला अवगत होते पुरणाची पोळी, लोण्याची पोळी हलक्या हाताने लाटाव्या लागतात तर गुळाची पोळी जरा जोर लावून लाटाव्या लागतात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.