मंगळवार, २२ जुलै, २००८

चारोळ्या

घर.....
तो म्हणाला, "मी आपल्या दोघांसाठीबारा खोल्यांचं प्रशस्त घर बांधलंय !
"मी म्हणालो, " मी बारा माणसांचंदोन खोल्यांचं घर वर्षानुवर्षे सांधलंय !"
पृथ्वी वरच्या पाककृती
पृथ्वी वृत्त -- तंत्र
जनास समरा जनास समरा यमाचा ल ग१७ अक्षरे, ८ यती।

वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी।
श्रीखंड-
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी
निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी
पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले
इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले
भजी
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले
चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
कढाइत भरूनि..........तेल अन आचत्या......लावुनी
भज्यास तळले..........गर्मागरम...............काढले बाहरी
गुलाबजामून (मधप्रदेशात "मावाबाटी")
दुधास अटवू...............खवा करुनि त्या..........मळावा पुरा
करोनि तवगोलकांस.......तळणी....................तळावा बरा
मधूर रसि.................डूबवूनि...................सम गोलकांना अरे
गुलाब जमना.............त्वरीत चखुनी.............जरा पाहिरे

कट्टा
कट्टे तह्रेतह्रेचे
कट्टे
हसत खिदळत चघळत गप्पा
बहरत खुलत सतत हा कट्टा
गहीवरून कधी बसतही धक्का
बांधीत नकळत मनांते
वासु कट्टा
वासुगट टारगट, फुकट धमाल
कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल
तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल
खटनट वासु म्हणे करन्ट कमाल
पेन्शनर कट्टा
म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले
सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले
पारावर चार पेन्शनर पळभर विसावले
गप्पांवर स्मृतींवर खरोखर तरवरूनी जगले
कचेरी कट्टा
टपरी आड खडं झाड पल्याड खुराडं कचेरीचे
जथ्थाड जाड उंचाड भांड खादाड कर्मचार्‍यांचे
वाढ हाड तयांना जुगाड खाडखाड हो कामाचे
कट्टा द्वाड, परी तडोताड चीरफाड नाड लालरंगांचे
महिला कट्टा
जमल्या दुपारल्या किटीला एका
महिला बला विशाला अनेका
हसल्या फुसकुल्या वात्रटल्या जोका
चाखल्या कागाळ्या, कानालाहलक्या
मिपा कट्टा
शब्द बांध धुंद उदंड छंद हप्ता भराचा
बलदंड अंदाधुंद अखंड तरंग हा भावांचा
नोंद प्रचंड सांडता मंद गंध कल्पनांचा
मिपा सांधे बंध करी थंड, ताप व्यापांचा
...... लगे रहो मिपावासीयों.....
एक अशीही केस...
काळा असल्यावर
सर्वांनाच आवडतो
पांढ-याच्या नशीबात
बायकोचाहीनसतो
गजरा.....
लांब केसांची वेणी उदास वाटते
केसांत फुलं माळ ग जरा
"चेहृयामागेही सौंदर्य आहे !"
डोकावून हळूच सांगेलगजरा
(काहीच्या) काही चारोळ्या
१. सोबत कुणी असेल,
तर सिनेमा पहायला अर्थ आहे
एकट्यानेच पाहायचा असेल,
तर अंधारही `व्यर्थ' आहे!
२.बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...
३.मी तुझ्याकडे यायला निघते
पण तुझ्यापर्यंत पोचत नाही
वाटेत २-४ मित्र भेटल्यावर
त्यांनाही सोडवत नाही।
काही "दारोळ्या"
प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ
मी दारू सॊडणार आहे
दारू म्हणते़ तुझा संकल्प
मीच ऊद्या मॊडणारआहे
***************************************
दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात
तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत
याचा अर्थ असा नाही की
त्यांची हाडे मॊडतनाहीत
***************************************
माझ्या हसण्यावर जाऊ नका
माझ्या रूसण्यावर जाऊ नका
एकदा प्यायला बसलॊ की
माझ्या असण्यावर जाऊ नका
***************************************
घराभॊवती कुंपण नकॊ
म्हणजे नीट आत जाता येत
बायकॊने नाही ऊघडल दार
तर पायरीवरच झॊपतायेत
***************************************
पाजणार कॊणी असेल तर
प्यायला तरूण तुर्क आहॊत
स्वतःच्या पैशानी प्यायला
आम्ही काय मुर्ख आहॊत?????
***************************************
आयुष्यात कधी ना कधी
आपण स्वत:ला
काही महत्त्वाचे प्रश्न
विचारलेच पाहिजेत...
आपण कोण आहोत?...
कोठून आलो आहोत?...
कोठे निघालो आहोत?...
आणि जेव्हा तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले
बार उघडे असतील का?!!!
***************************************
चढणं आणि पडणं
यात बरंच अंतर आहे
पाचव्या पेगपर्यंत चढणं
पडणं त्यानंतर आहे...
****************************************
तू माझ्यावर रागावणं
ही रोजचीच कहाणी आहे
तू दिसलीस की ती उतरते
तशी माझी नशा शहाणी आहे...
****************************************
मी पडताना माझा गाव
ओझरता पाहिला होता
मला पहायला सगळा गाव
गुत्त्यात जमून राहिला होता...
****************************************
गुत्त्यामध्ये प्रत्येकाला
खूपसं सांगायचं असतं
येताना चालायचं' तर
जाताना रांगायच असतं...
****************************************
आता मलाही लागलंय जमायला
तुझ्यासारखं वागणं
चार मित्र जमले की
ग्लास शोधायला लागणं
****************************************
सगळीच माणसं वरुन
निर्व्यसनी दिसतात
वासावरुन कळतं
काही तळीराम असतात
****************************************
भट्टीकाठचा पोलीस
दादाशी सलगीनं वागायचा
कारण त्याला जगायला
दादाचा हप्ता लागायचा
****************************************
अजून बर्‍याच आहेत..... पाहू ................