शुक्रवार, १८ जुलै, २००८

टोमॅटो भात रुतुकरन्दिकर गुरु, १६/११/२००६ - ०७:५९.

वाढणी:२ व्यक्ती साठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ मध्यम आकाराचे टोमॅटो,१ मोठा कांदा उभा चिरलेला
१ वाटी बासमति तांदूळ
दालचिनी पूड,जीरे पूड
१ तमालपत्र
लाल तिखट,मीठ,साखर,
तुप
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम तांदुळ धुवुन ठेवावे. टोमॅटो चिरुन मिक्सर मधुन वाटुन घ्यावे.प्रेशरपॅन मध्ये १ मोठा चमचा तुप टाकावे. त्यात तमालपत्र टाकावे.कांदा घालून लालसर होईतो परतावा.मग त्यात तांदुळ टाकुन २-३ मि. परतावे.
एक वाटी तांदुळाला दोन वाट्या टोमॅटोचा रस लागतो. दोन वाट्या रस घालावा.त्यात दोन चमचे लाल तिखट,पाउण चमचा दालचिनी पूड,पाउण चमचा जीरे पूड,मीठ,थोडी साखर घालुन २-३ शिट्या झाल्या की गॅस बंद करावा.

माहितीचा स्रोत:जोशीकाकू
अधिक टीपा:वाढताना वरुन कोथिंबीर,ओला नारळ घालून सजवावे। हा भात लाल रंगाचा असतो.त्यामुळे सजलेला भात लाल-पांढरा- हिरवा असा दिसतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.