मंगळवार, २२ जुलै, २००८

सिमला भजी रोहिणी शनि, २५/०२/२००६ - १५:३१.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
सिमला उर्फ ढब्बू मिरची २ (लांब आकाराच्या)
डाळीचे पीठ १ वाटी, अधपाव वाटी तांदुळाचे पीठ
लाल तिखट १ चमचा, हळद अर्धपाव चमचा, हिंग चिमुटभर, मीठ
तळणीसाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
सिमला मिरची लांबट म्हणजेच उभी व बारीक चिरणे. डाळीच्या पीठात तांदुळाचे पीठ, लाल तिखट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालून भजी करायला पीठ लागते (थोडे सैलसर) त्याप्रमाणे भिजवावे व त्यामधे सिमला मिरचीचे उभे चिरलेले काप घालून भजी करणे. (ज्याप्रमाणे बटाटा भजी करतो तशी) तादुंळाच्या पीठामुळे भजी कुरकुरीत होतात.
खूप मस्त लागतात. उभी चिरल्यामुळे दिसायला पण छान दिसतात.
रोहिणी
माहितीचा स्रोत:स्वानुभव
हे मनोगत वरुण घेतले आहे.