सोमवार, २१ जुलै, २००८

झटपट रवा उत्तप्पे अनुजा कुलकर्णी रवि, ११/०६/२००६ - २२:५३.

वाढणी:३-४
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाट्या रवा
१/२ वाटी तांदूळ पिठी
१/२ कांदा, १ टोमॅटो बारीक चिरून
१ इंचं आलं किसून, १-२ लसूण पाकळी ठेचून
२ हिरव्या मिरच्या, मूठ्भर कोथिंबीर बारीक चिरून
दही
क्रमवार मार्गदर्शन:
दही सोडून सगळे जिन्नस एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे.
थालिपीठाचे पीठ जितके ओले असते तितके ओले होईपर्यंत या मिश्रणात दही घालावे.
आवश्यकतेनुसार पाणी घालावे - डोश्याच्या पिठापेक्षा जाडसर ठेवावे.
हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे.
लगेच उत्त्प्पे घालायला तयार!!
माहितीचा स्रोत:मावशी - डॉ. सौ. आशा बडवे
अधिक टीपा:
उत्तप्पे घालण्यापूर्वी तवा भरपूर तापवावा.
कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी जास्त रवा आणि कमी तांदुळ पिठी घालावी.
कांदा, टोमॅटो व्यतिरिक्त वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या किंवा ईतर भाज्या घातल्यास छान लागते.
सांबार, चटणीसोबत मस्त लागतात!
he manogat varun ghetale aahe.