शनिवार, २६ जुलै, २००८

बेक्ड व्हेजिटेबल

वाढणी:४
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
मैदा १ वाटी, बटर १ चमचा, चीज ५ क्युब्ज़, दूध १ ग्लास
चिरलेल्या फ़रसबी, गाजर, फ्लॉवर, मटार ह्या सर्व भाज्या मिळून अर्धा किलो
मीठ, मिरपूड
क्रमवार मार्गदर्शन:
मैदा बटर वर भाजून घ्यावा. त्यात गुठळ्या होऊ न देता दूध घालून व्हाईट सॉस करून घ्यावा.
सर्व भाज्या चिरून घेऊन मीठ घालून वाफवून घ्याव्यात.
एक मोठा बाउल घेऊन त्यात सगळ्यात खाली भाज्या घालाव्यात.
त्यावर तयार केलेला व्हाईट सॉस, मिरपूड आणि किसलेले चीज घालावे.
ह्याच्यावर बाउल च्या उंचीनुसार असेच लेअर करावेत.
हा बाउल १० मिनिटे माईक्रोवेव्ह मध्ये बेक करावा.
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:
चीज खरपूस होइपर्यंत बेक केले तर अजून चान्गले लागते.