रविवार, २७ जुलै, २००८

पनीर कॉर्न खिमा

वाढणी:२-३ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पाव किलो पनीर, ४ मक्याची कणसं ( अमेरिकन कॉर्न चालतील), २ कांदे, १ मोठा टोमॅटो,
१ टिस्पून आलं-लसूण पेस्ट, मूठभर कोथिंबीर, १ पुदिन्याची काडी, हिंग, हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट,
१ टिस्पून गरम मसाला, चवीपूरती साखर आणि मीठ.
क्रमवार मार्गदर्शन:पनीर व मक्याची कणसे किसून घ्यावीत. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पूदिना अगदी बारीक चिरून घ्यावेत. पॅनमध्ये तेल तापवून त्यात हिंग, हळद, कांदा घालून परतावा. कांदा गुलाबीसर झाल्यावर टोमॅटो व आलं-लसूण पेस्ट घालून परतत राहावे. कडेने तेल सुटू लागले की तिखट, गरम मसाला घालावा. थोडे परतून त्यात कणसांचा किस घालून नीट ढवळून झाकण ठेवावे व दणदणीत वाफ आणावी. ४-५ मिनिटांनी झाकण काढून १-२ पाण्याचे हबके मारावेत व पून्हा झाकण ठेवून १ वाफ आणावी. आता पनीर घालावे व थोडे परतून उतरवावे. वाढताना कोथिंबीर पेरावी. गरम गरम फुलक्यांबरोबर मस्त लागतो हा पनीर-कॉर्न खिमा.
माहितीचा स्रोत:मैत्रीण
अधिक टीपा:थोडे फ्रेश क्रिम घातले तर स्वाद अधिक छान येतो। मक्याच्या कणसांऐवजी दाणे वापरले तरी चालतील. अंदाजे १५०-२०० ग्रॅम घ्यावेत. मिक्सर मधून भरडसर भरडून घ्यावेत.
हे मनोगत वरुण घेतले आहे.