शनिवार, २६ जुलै, २००८

शिंगाड्याचा केक

वाढणी:एक केक - साधारण ५ जणांसाठी पुरेल
पाककृतीला लागणारा वेळ:३०० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
एक वाटी शिंगाड्याचे पीठ
पाऊण वाटी साखर
अर्धी वाटी दही
अर्धी वाटी तूप
एक वाटी दूध
अर्धी वाटी ओले खोबरे आणि थोडा सोडा अगर फ्रूट
क्रमवार मार्गदर्शन:
Here's the recipe from Ruchira ( I have tried it several times, only once successfully)
दह्यामध्ये साखर, तूप, दूध व शिंगाड्याचे पीठ असे सर्व कालवून चार तास ठेवून द्यावे. नंतर केक करावयाचे वेळी त्यात अर्धा चमचा सोडा अगर एक चमचा फ्रूट सॉल्ट घालोन फेसावे. ओव्हन असल्यास ओव्हन मध्ये हा केक करावा. ओव्हन नसल्यास दोन जाड तवे विस्तवावर ठेवून, त्यावर वाळू घालून तापवावेत. शिंगाड्याचे फेसलेले पीठ एका थाळीत घालून, ती थाळी ओव्हन मध्ये ठेवावी किंवा एका तव्यावरील तापलेल्या वाळूवर ठेवावी व दुसरा तवा तापलेल्या वाळूसह झाकण ठेवावा. विस्तव मंद असावा. केके तयार झाल्यावर काढून सुरीने वड्या कापाव्यात.
माहितीचा स्रोत:रुचिरा
अधिक टीपा:
www.bhubhu.com
हे मनोगत वरुण घेतले आहे.