सोमवार, २८ जुलै, २००८

कुळथाचे (हुलग्याचे)पिठले.

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कुळीथ पीठ १/२ वाटी
३ ते ४ हिरव्या मिरच्या
६ते ७ लसूण पाकळ्या
एखादे आमसुल
ओले/सुके खोबरे, कोथिंबिर
तेल, मीठ, फोडणीचे साहित्य
क्रमवार मार्गदर्शन:कुळथाच्या पीठात ३ ते ४ वाट्या पाणी घालून कालवून घ्यावे, त्यात मीठ घालावे।तेलाची खमंग फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या, मिरच्या, आमसूल घालावे. व हे कुळथाचे पीठ घालावे. खोबरे व कोथिंबिर घालावे. खळखळून उकळू द्यावे, चांगले शिजू द्यावे.(काही जण फोडणीत पाणी घालून उकळतात व त्यात पीठ घालतात, पण गुठळ्या टाळण्यासाठी आधी पीठ पाण्यात कालवून मग फोडणीत घालणे चांगले. म्हणजे मी तरी तसे करते. )
हे मनोगत वरुण घेतले आहे.