मंगळवार, २९ जुलै, २००८

केळ्याचे धोणास (सांदण)

गोव्याच्या अमिताबाय सलत्री यांच्या "रुच्चीक" पुस्तकातून स्फूर्ती घेऊन :

(शिवाय त्यात काय फरक करून मिपा ईशान्य यूएस कट्ट्यासाठी ही पाकृ केली, ते सोयिस्कर फरक।)

साहित्य :
अ। सांदणासाठी

सुमारे ८ बुटबुटी हजारी किंवा कसलीही खूप पिकलेली केळी, शक्यतोवर गावठी(थोडीफार पिकलेली भद्दाडी दक्षिण अमेरिकन केळी ३ घेतली)३ वाट्या गव्हाचा किंवा तांदळाचा जाड रवा('इडली रवा' म्हणून मिळतो, तो दीड वाटी)१ मोठा चमचा घरगुती तूप(माझ्या घरी साधारणपणे तूप नसते, रिफाइन्ड तेल घेतले।)२ वाट्या किसलेला गूळ(केळी थोडीच पिकली होती, गुळाचे प्रमाण चव घेतघेत वाढवले.)७-८ काजूगरांचे तुकडे, किसमिस, वगैरेवेलच्यांची पूडहळदीचे पान - बारीक चिरून(हे मला अमेरिकेत मिळाले - घरी कुंडीत हळदीचे झाड आहे.)अर्धी वाटी खोबरे (अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस अर्ध्या वाटीभर नारळाच्या दुधात भिजवून 'बनवलेले' ओले खोबरे.)दोन चिमूट खायचा सोडा (ही युक्ती कमलाबाई ओगले यांच्याकडून.)

आ। 'चुन्न' = सारणाचे साहित्य आणि कृती

२ वाट्या खोबरे (वरच्यासारखेच बनवले)१ वाटी किसलेला गूळवेलच्यांची पूड१ मोठा चमचा घरगुती तूप(सर्व अर्ध्या प्रमाणात घेतले।)सर्व साहित्य एका भांड्यात गरम करून चांगले आळवा. कृती करण्यापूर्वी चुन्न/सारण तयार हवे.

कृती :
रवा तुपात (रिफाइन्ड तेलात) भाजून घ्या - फार तांबूस नको।केळी कुस्करून घ्या (मी किसून घेतली.)त्यात रवा + बाकी सर्व साहित्य-१ घाला.चमच्याने पडले पाहिजे - घट्ट असेल तर नारळाचे दूध घालून थोडे सैल करा. फार सैल नको.एका कुकरच्या भांड्याला तुपाचा/तेलाचा हात लावा. (मी हळदीच्या पानाच्या लांबलांब पट्ट्या कापऊन खाली शोभेसाठी मांडल्या.)अर्धे मिश्रण ओता. त्यावर चुन्न-सारणाचा थर द्या -अगदी कडेपर्यंत जायला नको.मिश्रणाचा उरलेला भाग घाला.कुकरमध्ये/मोदक वाफवायच्या भांड्यात वाफवा/शिजवा. साधारणपणे भात शिजायला लागतो तितका वेळ.घट्ट केकसारखे झालेले धोणास कुकरच्या भांड्यातून अलगद ताटलीत काढा.वरती-खालती निखारे ठेवून भाजा. (मी ओव्हनमध्ये "ब्रॉइल" केले.)खरपूस रंग बदलला की झाले.

धोणास गरम खावे, किंवा एक दिवस तसेच 'मुरत' ठेवून दुसर्‍या दिवशी गरम करून खावे।
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.