मंगळवार, १५ जुलै, २००८

कोल्हापुरी मिसळ ... वैश्री बुध, १२/०९/२००७ - २०:४२.

वाढणी:४-५ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ कप मटकी , २-३ कांदे, कोथिंबीर,लिंबु
तिखट, मीठ - चवीनुसार
तेल - १/३ कप
क्रमवार मार्गदर्शन:
१ कप मटकी पाण्यात एक रात्र भिजवावी. नंतर कपड्यात बांधून चांगले मोड येऊ द्यावे. मोड आलेल्या मटकीची नेहमी करतो तशी उसळ करून घ्यावी (फोडणी मध्ये मटकी घालून त्यात काळा मसाला,मीठ व थोडे तिखट घालावे)
कोल्हापुरी मिसळीमध्ये कट हा अविभाज्य घटक आहे.
कट करण्यासाठी कांदे,कोथिंबीर बारीक कापून घ्यावे..एका भांड्यात १/३ कप तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कांदे घालावे. कांदे चांगले परतल्यावर त्यात चवीनुसार तिखट घालावे. आता त्यात पाणी घालावे. (साधारण तेला चा तवंग दिसेल एवढे)
मिसळ थोडी व कट एकत्र करून त्यावर शेव,कचा कांदा,लिंबू,कोथिंबीर घालून ब्रेड बरोबर खा!!
चटकदार चमचमीत कोल्हापुरी मिसळ तयार!!
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:
वर दही सुद्धा घालून खातात.
हे मनोगत वरुण घेतले आहे.