मंगळवार, २२ जुलै, २००८

श्रावणघेवडा रोहिणी शुक्र, २४/०२/२००६ - २३:२७.

वाढणी:१ जण
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
श्रावणघेवडा (बीन्स) बारीक चिरलेला २ वाटी
अर्धा चमचा बारीक चिरलेले आले,
१ मिरची बारीक चिरलेली, चिरलेली कोथिंबीर ३-४ चमचे
दाण्याचे कूट ३-४ चमचे, ३-४ चमचे ओला नारळ
मीठ, तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे
क्रमवार मार्गदर्शन:
तेलाच्या फोडणीमध्ये मिरची, आले, घालून परतावे. नंतर त्यात चिरलेला श्रावणघेवडा (बीन्स) घालून परतावे. झाकण ठेवून २-३ मिनिटांनी ते काढून परत परतावे. असे ३-४ वेळेला करावे. म्हणजे भाजी वाफेवर चांगली शिजेल. भाजी शिजण्यापुरतेच अगदी थोडे पाणी घालावे. पाणी जास्त नको, कारण ही कोरडी भाजी आहे.
नंतर त्यात दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर व चवीपुरते मीठ घालून ३-४ वेळा परतणे. श्रावणघेवडा पटकन शिजण्याकरता खूप बारीक चिरावा.
रोहिणी
माहितीचा स्रोत:विनायकच्या मित्राची आई सौ रेगे।
हे मनोगत वरुण घेतले आहे.