शनिवार, २६ जुलै, २००८

खुडा

वाढणी:४ माणसांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
कांद्याची पात - ४/५ पातीचे कांदे
मेथी - अर्धा पाव
लाल तिखट (पावडर)
मीठ
तेल
क्रमवार मार्गदर्शन:
कांद्याची पात व मेथी स्वच्छ धुऊन एका फडक्यावर पंख्याखाली वाळवावी (पाणी सुके पर्यंत).
पात व मेथी वेगवेगळी बारीक चिरून घ्यावी
साधारण १/२ लि. दुधाचे भांडे असते तेव्हढ्या पातीला वाटीभर मेथी टाकावी. (मेथीचे प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी अधिक करावे)
चिरल्यावर एकत्र करून त्यात चवीनुसार तिखट व मीठ टाकून हाताने नीट कालवून एकजीव करून घ्यावे.
वर एक ते दीड टेबलस्पून तेल सोडून परत एकत्र करावे.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:हा खुडा पोळी, भाकरी, तळलेल्या पापडावर पसरून किंवा चिवड्या बरोबर खावा - मस्त लागतो।
हे मनोगत वरुण घेतले आहे.