शुक्रवार, १८ जुलै, २००८

खेळ पैशाचा - भाग ७ (अंतिम भाग मराठीतुन)

प्रेषक नाना चेंगट ( गुरू, 07/10/2008 - 14:38) .
राम राम मंडळी
आपण मी लिहिलेले लेखन ईंग्रजीत असले तरी वाचले याबद्दल मी आपला आभारी आहे. खरेतर मला आंग्ल भाषा तितकीसी आवडत नाही व नीट येत पण नाही, पण काही गोष्टींना आपला इलाज नसतो हेच खरे.
पैशाची निर्मिती ही बैंकाकडुन कशी केली जाते, जास्तीत जास्त लोकांनी कर्ज घ्यावे या चिंतेत असलेल्या बैंका भाव वाढ, चलन वाढ कशी आणतात व त्यामुळे चालना कशी मिळते हे आपणखेळ पैशाचा - भाग १ (पैशाची निर्मिती) http://misalpav.com/node/2436या भागात पाहीले.
भाव वाढ व चलनवाढ का होते तसेच आवश्यकता काञ ह्याचा आढावा आपणखेळ पैशाचा - भाग २ (इन्फ्लेशन) http://misalpav.com/node/2437या लेखात घेतला
बैकाची चलन वाढीसंबंधी काय भुमिका असते व त्यांचे याबाबतीतील धोरण यांचा परामर्श आपणखेळ पैशाचा - भाग ३ (बँकांची गरज - सतत इन्फ्लेशन) http://misalpav.com/node/2464या लेखात घेतला.
बाजारात आलेल्या पैशामुळे काय होते व त्याची परीणती कशात होते हे आपणखेळ पैशाचा - भाग ४ (पैशाचा साठा, प्रगती, मर्यादा) http://misalpav.com/node/2465या भागात पाहिले.
पैशामुळे मानव व पृथ्वी यांना किती गंभीर धोका निर्माण झाला आहे हेखेळ पैशाचा - भाग ५ (अर्थव्यवस्था कोसळण्याची गरज) http://misalpav.com/node/2467येथै आपण पाहीले व त्याचबरोबर जर आपण वेळेवर पाउल का उचलायचे हे आपण पाहीले
श्रीमंती आणण्यासाठी, किंमती स्थिर ठेवण्यासाठी व तिस-या जगातील लोकांना स्वस्तात राबविण्यासाठी केलेली कृती अमेरिकेच्या कशी अंगलट येत आहे व अमेरीकन अर्थव्यवस्था कशी कोसळण्याच्या मार्गावर आहे हे आपणखेळ पैशाचा - भाग ६ (अमेरीकन बॉण्ड्स करतील जागतिक उलतापालथ ) http://misalpav.com/node/2468या भागात पाहिले.
मुळात मला काही लोकांनी विचारलेल्या प्रश्नाचे थेट उत्तर या लेखांतुन जरी मिळाले नाही तरी नीट वाचल्या नंतर तुमच्या लक्षात येऊ शकेल की आज जी बाजारात परिस्थीती आहे ती तशी का आहे व त्याचे काय परिणाम होवु शकतात याचा विचार या लेखमालेत झालेला आहे. कुठे मी कमी पडलौ असेल तर ते माझे अज्ञान आहे व ते मी कबुल करतो.
आता थोडे मागे विचारलेल्या प्रश्नांबद्दल
तेजी मंदी ही सतत चालु असतात. व्याज दर कमी जास्त होत असतात त्यावरुन आपल्याला बाजारातील पैसा कमी करण्ञाचे व वाढवण्याचे आर बी आय चे धोरण समजते. ज्या वेळेस दर कमी होतो त्या वेळेस कर्जे घेणे फायद्याचे ठरते कारण चलन वाढी मुळै आपल्याकडे येणारा पैसा पण वाढतो व आपण परत फेड करु शकतो.
ज्या वे ळेस व्ञाज दर कमी होतो तेव्हा गुंतवणुक दार अधीक नफ्याच्या अपेक्षेने शेअर बाजारात पैसा टाकतो अशावेळेस शेअर मधील गुंतवणुक फायदेशीर ठरते पण जेव्हा दर वाढायला लागतात तेव्हा गुंतवणुकदार पैसे काढून घेतात कारण कंपन्याच्या नफ्यावर विपरीत परीणाम होत असतो. लक्षात घ्या कंपनी ने मागे कितीही चांगली कामगिरी केली असली तरी तिचा भाव हा केवळ आणि केवळ भविष्यातील उत्पन्नावरच आधारीत असतो. चांगल्या चा‍गल्या कंपन्या केवळ पुढील तिमाहीत नीट कामगीरी करणार नाहीत म्हणून या बाजाराने अक्षरक्षः नागवलेल्या आहेत. अशावेळी आपले पैसे शेअर बाजारातुन काढून स्थिर उत्पन्न देणा-या जसे मुदत ठेव रिकरींग किंवा सरळ बचत खाते यात टाकावे. बाजार काही संपुन जात नाही पुनःपुन्हा संधी मिळत असते. शोधावी लागते.
सोने चांदी यात पैसे टाकण्यास हरकत नाही पण मराठी माणसांचा ( जास्त करुन स्त्रियांचा) अवगुण असा की जरीचांगली किंमत येत असेल तरी ते विकत नाहीत तसेच सोने शुद्ध स्वरुपात न बाळगता दागिन्यांच्या रुपात वापरतात त्यामुळे परतावा चांगला मिळत नाही.
साधारण बाजारात काय चालु आहे ‍ ... लोक नवीन कर्ज घेत आहेत की जुने परतफेड करुन शांत बसण्याचे धोरण अंगिकारत आहेत यावरुन पुढील ६-१२ महिन्यात काय होवु शकते हे समजते. थोडे हिंडले, चर्चा केली की शहाणपण येते असे जे म्हणतात ते चुकीचे नाही .
महत्वाचे म्हणजे गांगरुन जायचे नाही. मुद्दल काही करुन गमवायचे नाही. फायदा कमी जास्त झाला तरी फरक पडत नाहि व मागिल आठवणींनी गहिवरुन जायचे नाही असे केले म्हणजे त्रास होत नाही
करा गुंतवणूक करा
सर्वांना शुभेच्छा
नाना चेंगट
(लेख आवडले वा नाही आवडले हे कृपया प्रतिसाद, खरड, व्यनि तुन कळवावे ही विनंती)
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.